Rajesh Biradar
1 Reviews
वाल्मी संस्थेतील अनुकंपा पद भरती प्रकरण तात्काळ निकाली काढण्या बाबत.
महोदय, आम्ही मृद व जलसंधारण पुरस्कृत जल व भुमी व्यवस्थापन (वाल्मी) संस्था औरंगाबाद येथील अनुकंपा धारक असून, गेल्या १० ते १५ वर्षा पासुन अनुकंपा तत्वावर नियुक्ती साठी वंचित आहे, तसेच आज रोजी पर्यंत वाल्मी संस्थेत ऐकाही अनुकंपा धारकांची नियुक्ती वाल्मी संस्थेत करण्यात आलेली नाही, संस्थेत गट ‘क’ व गट ‘ड’ या वर्गात सरळ सेवा पद भरती साठी रिक्त पदे असुन देखील अनुकंपा पद भरती प्रकरण निकाली काढण्यात आलेले नाही तरी वाल्मी संस्थेतील अनुकंपा धारकांनी मा. विभागीय आयुक्त साहेब औरंगाबाद साहेब यांच्या कार्यालयात दिनांक २६/१२/२०१९ रोजी मेल आयडी वरती तातडीने कार्यवाही करून प्रलंबित असलेली संस्थेतील अनुकंपा पद भरती प्रकरण निकाली काढण्यासाठी चे पत्र पाठविले असून त्या वरती मा. विभागीय आयुक्त साहेब यांनी २०/०१/२०२० रोजी वाल्मी संस्थेतील माननीय प्रशासकीय अधिकारी यांच्याशी समक्ष चर्चा करून प्रलंबित असलेली संस्थेतील अनुकंपा पद भरती प्रकरण तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले असून देखील वाल्मी संस्थेत अनुकंपा पद भरती प्रकरण निकाली काढण्यात आलेले नाही, तरी अनुकंपा धारकांना नोकरी नसल्याने अनुकंपा धारकांना उपास पोटी राहण्याची वेळ येत आहे, माननीय महोदय मंत्री साहेब आपण तात्काळ कार्यवाही करून प्रलंबित असलेली वाल्मी संस्थेतील अनुकंपा पद भरती प्रकरन निकाली काढण्यात यावी हि विनंती. आपले विश्वासू वाल्मी संस्थेतील सर्व अनुकंपा धारक ७३५०३८३७१७